वधू - वर फॉर्म

जळगाव शासकीय कार्यालयांमध्ये जगनाडे महाराजांची पुण्यतिथी व्हावी जळगाव तेली समाजाची मागणी

06 December 2019 sant santaji maharaj jagnade 135 views

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना दिले पत्र

         रावेर - शासकीय कार्यालयांत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. यासंदर्भात नगरसेवक अॅड. सूरज चौधरी यांनी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन शासनाचे पत्र दिले. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी आतापर्यंत सामाजिकस्तरावर साजरी होत होती, परंतु ही पुण्यतिथी विविध शासकीय कार्यालयातून देखील साजरी करण्याबाबतचा आदेश शासनाने मागील वर्षी काढला आहे. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी जगनाडे महाराजांच्या प्रतिमा देखील विविध कार्यालयात भेट देण्यात येत आहेत. नगरसेवक श्री. चौधरी यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयात प्रतिमा दिली. यावेळी पंकज चौधरी, भूषण चौधरी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Jalgaon Teli Samaj Wants Sant Santaji Maharaj Jayantiin Jalgaon Government offices

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेल घाणी, तेल घाणा