वधु - वर फॉर्म

संताजी पालखीचे आद्य संस्थापक शरद देशमाने.

14 July 2015 sant santaji maharaj jagnade 44 views

श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 15 )

( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने

आद्य संस्थापक शरद देशमाने 

santaji maharaj jagnade palkhi sansthapak sharad Deshmane

   शरद देशमाने चांगल्याचा मान राखणारे. या मातीचा, या संस्कृतीचा, या इतिहासाचा, या तत्त्वांचा, ज्यांनी ज्यांनी मान राखण्यात आपलेपण विसरून मान राखला ते कदाचित याचमुळे या घराण्याला देशमाने हे नाव मिळाले असावे. आपले नाव सार्थक करणारे हे शब्द. देमशाने पोलिस खात्यातला माणूस. पण वृत्तीन धार्मिक व श्रद्धाळू ते पुढे निघाले त्यांच्याबरोबर तुकाराम ओसरे, रामचंद्र शेजवळ ही मंडळी चालू लागली चालता चालता चाकणच्या धर्मशाळेत आली संताजींचे दर्शन घेतले. 

 ‘‘ राऊत, आम्ही तुमच्या बरोबर पंढरीला येणार‘‘ शरद देशमाने   

 ‘‘ मग काय संताजीनेच धाडले तुम्हाला‘‘ राऊत

    एवढे बोलून पालखीच्या पुढील अडचणी व मार्गाची चर्चा सुरू झाली दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी संताजींच्या जन्मभुमीतुन पालखी पुण्याच्या रस्त्याला लागली. सुरूवातीला चार पाच जणच होते. मनात रूखरूख होती. आता शरदराव व इतर मंडळी येऊन मिळाली. सर्वाच्यात वेगळी हुशारी व तरतरी आली. टाळ-मृदंगाला वेगळा नाद येऊ लागला. दुपार आल्यावर भोसरी गाव दिसू लागले. भोसरीच्या गेनूजी शेलारांनी व इतर बांधवांनी पालखीचे स्वागत करून जेवण दिले. याच वेळी अनंतराव जगनाडे व दगडूजी बारमुख ही दोन मंडळी आमच्यात सामील झाली. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक