Bride / Groom Form

संत जगनाडे महाराज जयंती शासकीय विभागात साजरी करावी - बीड तेली समाज

08 December 2019 sant santaji maharaj jagnade 75 views

८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज जयंती शासकीय परिपत्रकानुसार सर्व विभागात साजरी करावी- जय संताजी प्रतिष्ठान  

            बीड तेली समाज सन २०१९ मध्ये राष्ट्र पुरुष  / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक, जपूती २२१८/प्र.क्र.१९५/२९ मंत्रालय दिनांक:- २६ डिसेंबर २०१८ च्या ठरावानुसार विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी कार्यालय विभागात / जिल्ह्यातील शासकीय कार्यालय / निमशासकीय कार्यालयात ८ डिसेंबर रोजी " संत जगनाडे महाराज जयंती" साजरी करण्यात यावी असे शासनाच्या वरील प्रपत्रकानुसार निर्देशित केले आहे. तरी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करावी ,असे आव्हान जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडचे अध्यक्ष रामेश्वर पवार, जिल्हा कार्याध्यक्ष शिवलिंग क्षीरसागर, विजय वाघमारे,आनंद क्षीरसागर, योगेश पवार, सतीश साखरे , रामेश्वर व्यवहारे, अक्षय मेहरकर  तसेच सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व तेली समाज बांधवांच्या वतीने विनंतीपूर्वक करण्यात येत आहे.तरी बीड शहरात महाराजांची प्रतिमा जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय,प्रकल्प अधिकारी कार्यालय, सरकारी दवाखाना,शहर पोलिस ठाणे,शिवाजी नगर पोलिस ठाणे, ग्रामीण पोलिस ठाणे,पेठ बीड पोलिस ठाणे , बीड आकाशवाणी  केंद्र, बस्थानक आगार,पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय सह आदी ठिकाणी उपलब्ध करून भेट दिली..

Beed Teli Samaj Sant santaji maharaj Jagnade jayanti in Government offices

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज को बदनाम आपमानीत करने का नया षंडयंत्र ? कोल्हू / तेल घाणा की सच्चाई क्या है ? | Teli Samaj