Bride / Groom Form

संत शिरोमणी संताजी महाराज जयंतीनिमित्त पुणे तिळवण तेली समाज आयोजित दुचाकी रॅली

08 December 2019 sant santaji maharaj jagnade 70 views

     पुणे तिळवण तेली समाजाच्यावतीने आज संत शिरोमणी संताजी महाराज जयंतीनिमित्त भवानीपेठ कार्यालय ते पुणे महानगरपालिका येथेपर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दुचाकी रॅलीमध्ये सर्व पुणे शहरातील समाजबांधव एकत्रित जमा झाले. रॅली रामोशीगेट, मॉर्डन चौक, नानापेठ, लक्ष्मी रोड, पवळे चौक, कुंभारवाडा, शनिवार वाडा मार्गे  पुणे महानगरपालिका येथे पोहचली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ व आबा बागुल यांच्या शुभहस्ते संत संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दोन्ही मान्यवरांचा यावेळी समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुणे शहरातील कॅम्प, हडपसर, बिबवेवाडी, कोथरूड, औंध,भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थीत होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav