वधू - वर फॉर्म

जवळे येथे जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात साजरी

09 December 2019 sant santaji maharaj jagnade 108 views

       जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती साजरी करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक संताजी जगनाडे महाराज यांची वारकरी संप्रदायात ओळख आहे. सन २०१८ मध्ये शासनाने जगनाडे महाराज यांना राष्ट्रीय संत घोषित केले. ८ डिसेंबर २०१९ पासून शासकीय-निमशासकीय शाळा, कॉलेज, कार्यालयांमध्ये जयंती साजरी करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. असे पारनेर तालका तिळवण तेली समाज उपाध्यक्ष शिरीष शेलार यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव सालके, भाजप जिल्हा सरचिटणीस कृष्णाजी बडवे, किसन आढाव, जालिंदर सालके, मदन रलपारखी. भाऊसाहेब शेलार, कैलास शेलार, विनायक शेलार, सुभाष शेलार, बबन शेलार, राजेंद्र शेलार, संदेश शेलार, मधुकर लोखंडे, संदीप शेलार, अभिषेक शेलार, तन्मय आंबेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Jawale Teli Samaj Santa santaji jagnade maharaj jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj