Bride / Groom Form

रत्नागिरी जिल्हा तेली समाज आयोजित संत जगनाडे महाराजांची ८ रोजी जयंती

05 December 2019 sant santaji maharaj jagnade 82 views

        वरवेली  : तेली समाजाचे दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातही संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करावी असे म्हटले आहे. शासनाने घेतलेला निर्णय तेली बांधवांसाठी आनंददायी असल्याचे रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी सांगितले. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या श्री संत जगनाडे महाराज जयंतीसाठी संत संताजी महाराज यांचे अधिकृत छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील तेली समाजातील वाडीवस्त्यावरही जयंती साजरी करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यलयात होणाऱ्या जयंतीसाठी सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष रामदास तडस व रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ अध्यक्ष रघुवीर शेलार, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना लांजेकर व सर्व तालुकाध्यक्षांनी केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj