वधु - वर फॉर्म

होय मी तेली आहे ही रावसाहेबा ची भुमीका.

07 December 2019 Teli samaj 48 views

एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 4)

होय मी तेली आहे ही त्यांची भुमीका.

Raosaheb Shankar Ramchandra Panhale Teli Samaj     सह्याद्रीच्या अंबेगावात अजोबा तेल घाना घेत होते. वडिल पुण्यात आले. नातेवाईकात उभे राहिले. हात दिला घेतला होता. आईने हा आपला समाज व आपण त्याचे घटक ही शिकवण वडीलांच्या अकस्मीत जाण्या नंतर दिली होती. ते आपल्या त्यागातुन वेळ काढुन समजात जात येत असत रावसाहेब केदारी, आप्पासाहेब भगत, शंकरराव करपे यासारख्या समाज बांधवा बरोबर समाज विकासात सहभागी आसत. 1942 साली ते पुणे येथील समाजाचे सचिव झाले. पुढे 1952 मध्ये पुणे शहर अध्यक्ष म्हणुन कारभार पाहू लागले. समाजाला कर्ज काढुन मंगळवार पेठेतील इमारत दुरूस्ती करावी लागत होती. तसे न करता स्वत: व समाज सहभागातून इमारत दुरूस्त केली. पुणे लष्कर भागात व्हावळ बंधुचीं जागा होती यातील काही भाग देणगी घेतला व उरलेला भाग कमी भावात समाजाला विकत घेण्यास लावली. ते समाज अध्यक्ष म्हणुन 1959 पर्यंत होते. 

    तुकाराम हे एक परिवर्तनवादी संत. यांनी पिळल्या जाणार्या समाजाला सक्षम केले. छत्रपती शिवरायांना भाकरी हातावर घेऊन कट्टर मावळे दिले आसतील ते तुकारामांनी. याची पुर्ण साक्ष तुकोबांच्या पाईकाचे अभंग यात दिसून येते. मानवता विसरलेल्यांना वेशीवर टांगुन देव हा सर्वांचा आहे. भक्ती ही श्रेष्ठ आहे हे मांडले. या वेळी संघर्ष झाला. या संघर्षात त्यांना खरी सोबत संत संताजी जगनाडे यांनी दिली. अभंग इंद्रायणीत बुडवल्या नंतर संत संताजींनी ते लिहुन ठेवले व जपलेही आज जे खरे तुकोबांचे अभंग ओळखले जातात ते संताजी कडील आहेत. 1920 च्या दरम्यान संताजींची ओळख झाली. ते रावसाहेब केदारी यांच्या बरोबर जात आसत. 1959 मध्ये रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे यांची निवड श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदूंबरे या संस्थेच्या अध्यक्ष पदी झाली. पुर्वजांनी आगदी श्रमदान करून मंदिर उभारले होते. ते उन्हा व पावसात मोडकळीस आले होते. यांच्या जीर्णद्धोराचा विषय निघाला समाज बांधवांनी व स्वत:चे से 17,000 रूपये खर्च करून दगडी मंदिर व सभा मंडप उभारला. विशेष म्हणजे सदर दगडी मंदिर आज सुद्धा अस्तित्वात आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala