वधू - वर फॉर्म

औरंगाबाद तेली समाजाच्‍या वतीने संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त वाहन रॅली

13 December 2019 Teli samaj 108 views

         औरंगाबाद तेली समाज - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थान गणपती ते शनीचौक दरम्यान रविवारी (दि.८) वाहन रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. मच्छली खडक, गुलमंडीमार्गे टिळकपथ, पैठणगेट, क्रांती चौक, अमरप्रीत चौक, आकाशवाणी, त्रिमूर्ती चौकमार्गे गजानन मंदिर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, संताजी चौक तेथून सिडको बसस्टॅण्डमार्गे चिकलठाणा येथील गणेश मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले, भाजप प्रदेश सदस्य अनिल मकरिये, उपमहापौर विजय औताडे, मनपा सभापती जयश्री कुलकर्णी, मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे, जयवंत (बंडू) ओक, कचरू वेळंजकर, किशोर चव्हाण, अशोक पाखरे, रमेश क्षीरसागर, भारत कसबेकर, विशाल नांदरकर श्रीराम कोरडे, प्रल्हाद पवार, सुनील क्षीरसागर, अनिल क्षीरसागर, जगदिश नांदरकर, योगेश मिसाळ, राजू मगर, रामेश्वर लोखंडे, प्रशांत धारकर, संदीप हिरे, नीलेश धारकर, गणेश पवार, संतोष सुरळे, विष्णू क्षीरसागर, शुभम दहिवाळ, सुनील मिसाळ, रवी लिंगायत, अनिल सदानसे, लखन कोल्हापरे, दत्ता क्षीरसागर, दत्ता लटे, भिकन राऊत, रामेश्वर मिटकर, विनोद कसबेकर, संतोष पवार, यश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Aurangabad teli Samaj sant Santaji Jagnade Maharaj Jayanti vehicle rally

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh