वधू - वर फॉर्म

पंढरपूर तेली समाज महासभेच्या वतीने संत संताजी जगनाडे यांची जयंती

13 December 2019 sant santaji maharaj jagnade 132 views

     पंढरपूर महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर सोलापूर जिल्हाध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्यावतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती पंढरपुरातील मध्यवर्ती शिवतीर्थ येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले व अंध अपंग शाळेतील मुलांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अंध अपंग शाळेतील मुलांनी गीत गायनाने केले.

      यावेळी काँग्रेसचे नेते मामा फलटणकर, नगरसेवक श्रीनिवास बोरगांवकर, निलेश आंबरे, माजी नगरसेवक सायबू चौगुले, शिवबुध्दचे संदिप मुटकुळे, संभाजी ब्रिगेडचे स्वागत कदम, पिंटू मांडवे, युवराज भोसले, सोपानकाका देशमुख, प्रा.अशोक डोळ, राष्ट्रवादीचे संदिप मांडवे, राकेश साळुखे, भाजप युवा मोर्चाचे विदुल अधटराव, संतोष बंडगर, आण्णा सलगर, मनोज आदलिंगे,गोटू दहिवडकर, सागर पडगळ, भैय्या वाखरकर, संतोष देशमाने, बालाजी देशमाने, आकाश पवार, शहाजी शिंदे, संदिप शिंदे, कृष्णा कवडे, समाधान बिडकर, धनंजय देशमाने, सागर वाठारकर, रामकृष्ण क्षिरसागर, चंद्रकांत क्षिरसागर, प्रशांत घोडके, विशाल नागमल, नागेश नागमल, हरिभाऊ परदेशी, अंध शाळेचे कटप सर, प्रताप ताठे, कपील जगताप यांच्यासह मान्यवर व विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार महासभा पंढरपूर सोलापूर जिल्हाध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी मानले.

Pandharpur Teli Samaj mahasabha sant Santaji Jagnade Maharaj Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj