वधू - वर फॉर्म

लोणावळा नगर परिषदेत संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी

13 December 2019 sant santaji maharaj jagnade 86 views

     लोणावळा तेली समाज - श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती लोणावळा नगर परिषदेत प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी प्रतिमा पूजन केले तर उपनगराध्यक्ष श्रीघर पुजारी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी नगरसेवक राजाभाऊ खळदकर, माजी नगरसेविका सुमनताई होगले, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दुगुडि, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य हर्षल होगले आदी मान्यवर उपस्थित होते. संत जगनाडेमहाराज यांची जयंती महाराष्ट्रात सर्वत्र शासकीय पातळीवर साजरी केली जावी, असा शासनाने अध्यादेश काढला होता. दोन दिवसांपूर्वीच तेली समाजाच्या प्रमुखांनी नगर परिषदेत संत जगनाडेमहाराज यांची जयंती साजरी करण्याचे निवेदन व शासनाचा अधादेश दिला होता. यानुसार रविवार असताना देखील नगर परिषद जयंती साजरी करण्यात आली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh