वधु - वर फॉर्म

मालेगाव कॅम्पला श्री संत संताजी महाराज जयंती

13 December 2019 sant santaji maharaj jagnade 65 views

     मालेगाव कॅम्प : येथील महानगर तेली समाज आणि संताजी महाराज उत्सव समितीतर्फे अंबिका मंदिरात संताजी महाराज जयंती रविवारी (ता.८) झाली. यानिमित्त संताजी उत्सव समितीतर्फे मिरवणूक काढली होती. त्यानंतर प्रमुख पाहणे माजी मंत्री, आमदार दादा भुसे यांनी प्रतिमापूजन केले. या वेळी अध्यक्ष सर्जेराव चौधरी, संस्थापक माणिक चौधरी, उपाध्यक्ष बंडू चौधरी, कोशाध्यक्ष शिवाजी चौधरी, सचिव विशाल चौधरी, मालेगाव महानगर तैलिक महासभा, संताजी ब्रिगेड संघटना आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले. प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी, तर तहसील कार्यालयात तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी प्रतिमापूजन केले. महापालिकेत उपायुक्त विलास गोसावी यांनी, तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक पाटील यांनी प्रतिमापूजन केले. या वेळी कार्यक्रमास राजेश बडवणे, दगा चौधरी, राजेंद्र बागूल, रमेश चौधरी, रमेश उचित, गोविंद करपे, दत्ता जाधव, आबा बागूल, आनंदा महाले, रवी चौधरी, ज्येष्ठ पत्रकार भगवान बागूल, पोपट चौधरी, दत्ता जाधव, गोकुळ चौधरी, संजय चौधरी, कमलेश सूर्यवंशी, राजेंद्र चौधरी, मधुकर गायकवाड, डॉ. अनुदास सूर्यवंशी, मोहन पवार आदी उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi