Bride / Groom Form

संगमेश्वर तेली समाज सेवा संघ आयोजित संगमेश्वर तालुका तेली समाज मेळावा

14 December 2019 sant santaji maharaj jagnade 84 views

    संगमेश्वर तेली समाज सेवा संघ, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने, रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी, सकाळी १०.०० वा. संगमेश्वर तालुका तेली समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये तेली ज्ञाती समाजाच्या तालुका नुतन दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण आणि महिला हळदीकुंकू होणार आहे. तरी सर्व  समाज बांधवानी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा ही विनंती करण्‍यात आलेली आहे. 

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  -  मा. श्री. डॉ. भूषण कर्डिले, महासचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. गजानन (नाना) शेलार कोषाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, महाराष्ट्र राज्य,  मा. श्री. गणेश धोने, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, कोकण विभाग, मा. श्री. चंद्रकांत झगडे, सचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, कोकण विभाग, मा. श्री. विनायक राऊत, अध्यक्ष, सेवाआघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, कोकण विभाग मा. श्री. रघुवीर शेलार, जिल्हाध्यक्ष, तेली समाज सेवा संघ, रत्नागिरी व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष  अध्यक्ष, तेली समाज सेवा संघ, संगमेश्वर तालुका तर कार्यक्रमाचे स्थळ : चिंतामणी हॉल, मातृमंदिर जवळ, मधलीआळी, देवरुख. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar