वधू - वर फॉर्म

संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

15 December 2019 sant santaji maharaj jagnade 103 views

     संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती बाबत शासनाने GR (शासकीय आदेश) काढला व या वर्षी सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालयांना दिनांक 8 डिसेंम्बर रोजी संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंघाने डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे श्री तुषारभाऊ झापर्डे यांनी व आर्थिक गुन्हे शाखा येथे श्री गुड्डू भाऊ मीसुरकार यांनी संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली. दोन्ही मान्यवरांचे  तेली समाजाच्‍या  वतिने हार्दिक अभिनंदन करण्‍यात आले.

    याच प्रमाणे अनेक समाजबांधव व माता भगिनी यांनी आपापल्या घरी, गावात ग्रामपंचायत कार्यालयात व इतर व्यवसायाच्या व सार्वजनिक  ठिकाणी संताजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनोभावे वंदन व पूजन केले.

Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti By police officers

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar