वधु - वर फॉर्म

पैठण तेली समाज संत संताजी महाराज जयंती ऊत्साहात साजरी

15 December 2019 sant santaji maharaj jagnade 51 views

    पैठण दि 8 डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण येथे संताजी महाराज मंदिरात संताजी महाराज जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पैठण नगरीचे नगर अध्यक्ष सुरज लोळगे, पैठण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री वारे साहेब,  गीराशे साहेब, नगरसेवक बजरंग लींबोरे साहेब, आबासेठ बरकसे, संस्थेचे अध्यक्ष विक्रमसेठ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव बरकसे,सचिव भगवान मिटकर,सहसचिव एकनाथ क्षीरसागर ,पैठण तेली समाज अध्यक्ष तुळसीदास खर्गे  शिवमुर्ती ससाणे, गंगाधर मस्के,शिवशंकर शिंदे, हरीभाऊ नागले, बद्रीनाथ सिरवतअदी मांन्यवरांच्या हस्ते संताजी महाराजांचे पूजन करण्यात आले तसेच संस्थेचे वतीने सर्व शासकीय कार्यालयास संताजी महाराजांची प्रतिमा देण्यात आल्या व ह भ प देवीदास महाराज मिसाळ केर्हाळा यांचे कीर्तन झाले  व रामनाथजी महाराज ससाणे यांनी हरीपाठ,प्रवचन सेवा केली,उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच प्रस्तविक सचिव भगवान मिटकर यांनी केले तर आभार अंकुश म्हस्के यांनी मानले सुत्रसंचालन प्रवीण सर्जे यांनी केले कार्यक्रम यशस्वीते साठी सतिश सर्जे, प्रकाश दारुणकर,  लक्ष्मण मस्के, दिलीप जटाळे, गणेश खंडागळे, सुनिल मिसाळ, सुभाष मिसाळ, किशोर खर्गे, सोमनाथ खर्गे, बाळासाहेब सोनवणे, नितीन मिसाळ, बबनराव वाडेकर, भिमराव शिंदे, भिमराव सोनवणे,अनिल खर्गे, गोकुळ बरकसे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, दत्तां तापकीर,नी परीश्रम घेतले कार्यक्रमास बहुसंख्य वारकरी, समाज बांधव उपस्थित होते या प्रसंगी फराळ व अन्नदान करण्यात आले.

Paithan Teli Samaj Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi