वधू - वर फॉर्म

तेली समाजोन्नती संघा तर्फे २९ रोजी मुंबईत तेली उद्योजक मार्गदर्शन शिबिर 

21 December 2019 sant santaji maharaj jagnade 104 views

      वरवेली तेली समाज  - तेली समाजोन्नती संघ तालुका चिपळूण व गुहागर संघाच्या वतीने तेली समजातील उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबीर बांधवांसाठी उद्योग व व्यापार मार्गदर्शन) दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. भगवती बॅकचेटस शंग्रीला कंपनीसमोर हॉटेल गोपालाजच्या मागे एल. बी. एस. मार्ग भांडुप (प) मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. तेली समाजातील काही यशस्वी उद्योजक आणि व्यापारी तसेच लघु उद्योग मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. तेली समाजातील उद्योजक व व्यावसायिक यांचा परिचय व्हावा व आपल्या सर्वांना त्यांच्या व्यवसायाची, उत्पादनाची माहिती मिळावी तसेच विद्यार्थी व तरुण वर्गाला प्रोत्साहन मिळावे व त्यातून उद्योजक घडावे त्याचप्रमाणे समाजातील बंधू भगिनी यांनाही याचा उपयोग व्हावा, यासाठी हा संघातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबत उमेश महाडिक, गणेश रहाटे रवींद्र चव्हाण यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन तेली समाजोन्नती संघाचे अध्यक्ष वसंत पवार भातगावकर कार्याध्यक्ष जयवंत रसाळ यांनी केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा