वधू - वर फॉर्म

अकोला जिल्हा तेली समाज श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी

21 December 2019 sant santaji maharaj jagnade 84 views

अकोला जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा आयोजित 

     अकोला जिल्हा श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व शाखीय तेली समाजाची शोभायात्रा. तेली समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अकोला जिल्हा कार्यकारिणी वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे. शोभायात्रेची सुरुवात श्री राजेश्वर मंदिरापासून पुढे जयहिंद चौक, लोखंडी पुल, सिटी कोतवाली, गांधी चौक, खुले नाट्यगृह, धिंग्रा चौक व सांगता स्वराज्य भवन येथे होणार आहे.

      सर्व तेली समाज बांधवामध्ये सद्भावना, ऐक्य व प्रेम निर्माण होण्याच्या हेतूने आयोजित शोभायात्रेमध्ये सहकुटूंब, सहपरिवार सहभागी व्हावे हि नम्र विनंती करण्‍यात आलेली आहे. शोभायात्रा: मंगळवार, दि. २४/१२/२०१९ वेळ : सकाळी ९ वा. ३० मि. स्थळ : श्री राजेश्वर मंदिर, जयहिंद चौक, अकोला, आयोजिक  महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा जिल्हा कार्यकारीणी अकोला.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana