वधू - वर फॉर्म

कोल्हापूर लिंगायत तेली समाज वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा

22 December 2019 Teli samaj 101 views

     कहाड : कोल्हापूर लिंगायत तेली समाज अंतर्गत राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी हा मेळावा पार पडणार आहे, अशी माहिती समाजाचे कन्हाड शहराध्यक्ष रवींद्र मुंढेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत तेली समाज आहे. यंदा ज्यांना कर्तव्य आहे, अशा तरुण-तरुणांनी त्यांच्या घरातील व समाजातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने अनुरुप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी व्हावे. समाजाची प्रगती हेच आमचे ध्येय असल्याने समाजाचे प्रश्न व अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहमेळाव्याचा वधू-वर व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सुधारक बेंद्रे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोखंडे, उपाध्यक्ष संदीप मुंढेकर, क-हाड दक्षिणचे अध्यक्ष दत्तात्रय तारळेकर, कार्याध्यक्ष सतीश बेडके, शहराध्यक्ष रवींद्र मुंढेकर यांनी केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar