वधु - वर फॉर्म

एरंडेल तेली समाज गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी गठित.

17 February 2017 teli samaj vadhu var melava 68 views

    गडचिरोली : येथील पटवारी भवनामध्ये आयोजित बैठकीत एरंडेल तेली समाजाची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.

    बैठकीच्या अध्यक्षस्थानीनागपूर विभागाचे सचिव विठ्ठलराव निखुले होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. परसराम नागोसे, ताराचंद नागोसे, पं.स. सदस्य सविता कावळे, राजेंद्र भरडकर आदी उपस्थित होते. जिल्हा कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून धुंडेशिवणी येथील भगवान ठाकरे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून कवडू समर्थ, चंद्रशेखर मुरतली, सचिव रेणुदास सहारे, सहसचिव जगदीश्वर ठाकरे,  मुख्य संघटक फकिरा भरडकर, कोषाध्यक्ष तुळशिदास करकाडे, सदस्य सुखदेव  कोलते, राजू ठाकरे, युवराज करकाडे, घनश्याम लाकडे, संभाजी ठाकरे, नामदेव कोलते, जीवनदास कोलते, कृष्णा भरडकर आदींचा समावेश आहे. महिला अध्यक्ष म्हणून लता यांची निनवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून ऐश्वर्या लाकडे, सहसचिव निलू निकुरे, कोषाध्यक्ष अर्चना कोलते, मुख्य संघटक सविता कावळे आदींची निवड करण्यात आली.
 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar