वधु - वर फॉर्म

तेली समाजाला द्या दहा टक्के आरक्षण

08 January 2019 Teli samaj 76 views

तेली महासंघाने उचलली मागणी

    नागपूर मराठा समाजाला राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण जाहीर करताच आता तेली समाजानेदेखील दहा टक्के आरक्षणाची मागणी पुढे केली आहे. मराठा समाजाप्रमाणेच तेली समाजदेखील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे तेली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास (टीईबीसी) असा नवा प्रवर्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे मुख्य संयोजक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. -

   महाराष्ट्रातील सुमारे ३५० जातींना इतर मागासवर्गीय प्रवर्गात टाकून केवळ १९ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणासाठी केवळ दहा टक्के शिष्यवृत्ती जाहीर झाली. पण, ती योजनादेखील कागदावरच आहे. इतर शिष्यवृत्तीच्या योजना, वसतिगह सविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ओबीसींचा सरकारी नोकरीतील

   अनुशेष भरतीबाबत राज्य सरकार गंभीर नाही. त्यामुळे आता ओबीसी समाज शांत बसणार नाही, असे कारेमोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

   मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारने असंवैधानिक खटाटोप केला आहे. भारतीय जनता पक्षाचा परंपरागत मतदार हा तेली समाज आहे. त्यामुळे या समाजाच्या विकासासाठी टीईबीसी अस वर्ग तयार करून दहा टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तेली समाजाचे नेतृत्व करणाऱ्या भाजप नेत्यांनी आपल्या समाजाच्या विकासासाठी दहा टक्के आरक्षणाची मागणी उचलून धरावी. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कारेमोरे यांनी दिला आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu