वधू - वर फॉर्म

वांझोटे कार्यक्रम, व्हॉटसऑपचे कार्यकर्ते व वधु-वर मेळाव्यातील नाकर्ते पणा.

08 September 2015 Teli samaj 113 views

वांझोटे कार्यक्रम, व्हॉटसऑपचे  कार्यकर्ते व वधु-वर मेळाव्यातील नाकर्ते पणा. (भाग 1)

    माझी बातमी माझा फोटो एवढेच वाचन करणारे आता बांधव वाचन करू लागले. आपली मते बनवु लागली. ही परिवर्तनाची वाट निर्माण झाली. कारण तेली गल्ली मासिक मिळताच त्यातील लेख वाचन करून आपली परखड मते शेकडो. बांधव देतात. ही आता जमेची बाजु समाजात निर्माण झाली त्या बद्दल सुज्ञ बांधवांचे आभार. तेली समाज सेवक मासिकात युवकांचे चिंतन शिंबीर व संपादकीय लेखात श्री. भगवान बागुल यानी बर्‍याच गोेष्टी मांडल्या आणि त्या मांडताच मासिकाचे संचालक मंडळ चुळबुळ करू लागले.  त्यातील हायकमांडला प्रश्‍न पडला तेली गल्ली मासिकात जे येते ते ठिक पण आपल्याच मासिकात त्या पद्धतिने येणे ठिक नाही. परंतु याच वेळी बागुलांना बर्‍याच बांधवांनी अभिनंदन पर मते कळवली. याचा अर्थ एकच हाय कमांडला समाजाच्या खर्‍या समस्या घेऊन संघर्ष करावा लागेल. ही वास्तवता समोर आली. श्री. बागुल सरांनी आपल्या लेखात एक शब्द प्रयोग वापरला प्रथम त्यांचे अभिनंदन करतो. तो शब्द प्रयोग आसा पुरे झाले वांझोटे कार्यक्रम. परत आपन या सर्वांचा समाचार घेऊ. आपल्या वेदनांचा मागोवा घेऊन तेली बलवान करू.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala