Bride / Groom Form

श्री संताजी जगनाडे महाराज महामंडळासाठी लढा उभारणार

12 February 2020 Teli samaj 89 views

      गणेश पवार औरंगाबाद : तेली समाज हा कष्टकरी व स्वाभिमानी समाज असून महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या प्रचंड आहे. असे असताना तेली समाज हा विकासापासून कोसोदूर आहे. समाजाच्या तरुणांना उद्योगधंद्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत श्री जगनाडे महाराज यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी समाजसंघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने गणेश पवार यांनी केली. तेली समाजाच्या संघटनेची नुकतीच बैठक झाली. यावेळी श्री. पवार म्हणाले, की तेली समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संत श्री संताजी जगनाडे महाराज स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणे गरजेचे आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. माजी मंत्री तथा अ. भा. तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेण्यात येणार आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu