वधु - वर फॉर्म

पुणे तिळवण तेली समाज महाराष्ट्रात अग्रेसर :- संजय पाटील, पोलीस आयुक्त.

18 September 2015 O.B.C. 0 views

tilvan teli samaj old leader satkar

    पुणे :- तिळवण तेली समाजा तर्फे 15 ऑगष्टचे ओचित्य साधुन समाज बांधवांचा सत्कार सामारंभ आयोजित केला होता. सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त संजय पाटील आपल्या भाषणात म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील आमच्या गावची पाटीलकी ही पुर्वी पासुन आहे. मी जेथे जथे नोकरी निमित्त होतो तेथे समाजाचे प्रश्‍न कायद्याच्या कक्षेत राहुन सोडवले आहेत. कुणाला अडचन असेल मार्गदर्शन हवे असेल तर जरूर भेटा मी सहकार्य करेल. कारण पुणे समाजाच्या कामाची परंपरा आहे. समाजाचे काम महाराष्ट्रात अग्रेसर आहे.

    कार्यक्रमाचे प्रासतविक श्री. रामदास धोत्रे, मा. अध्यक्ष यांनी केले त्यावेळी त्यांनी सांगितले. पुणे समाजाने संत संताजी महाराजांचे समाधी स्थळ उभे करण्यास कष्ट घेतले. श्री संत संताजी पालखी सोहळा सुरु करणे व वाटचाल प्रदिर्घ करण्यास तन मन व धन वेचले आहे. विदयार्थी वसतीगृह चालू ठेवले त्यामुळे व वसतीगृहात राहिलेले बरेच बांधव शास्त्रज्ञ उद्योजक व अधीकारी झालेत. समाजा तर्फे भव्य वधुवर मेळावा आयोजीत केले जातात आज संस्था कमाल 10 लाख रूपय शिल्लक ठेवुन आहे. या वेळी सर्वश्री संजय पाटील,  आयुक्त, डॉ. प्रकाश सहिंद्रेकर, व्हावळ, क्षिरसागर, अनिल धोत्रे मोहन देशमाने बाळासोा. अंबिके, गणपतराव शेडगे भोज, संदिप देशमाने यांना शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ समाज बांधव श्री. अंबादास शिंदे यांनी भुषवले त्यांनी आपल्या भाषणात  तिळवण समाजाच्या वाटचालीचा इतिहास मांडला. इथे समाज घडवला जातो मते जरूर असतात पण भेद नसतात याचा त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या हास्ते इतर मान्यवरांच्या हास्त 10 वी 12 वी इंजीनिरींग मेडिकल व स्पर्धी परक्षेत उल्लेखनीय का केलेल्या विद्यार्थींचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला. पुणे शहराच्या भव्य परंपरे प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रम पुर्वी करमणुकीचे कार्यक्रम श्री. टाके यांनी सादर केले. संपुर्ण कार्यक्राचे सुत्र संचालन सौ. दिपा व्यवहारे यानी समय सुचक शब्दात सदर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष सर्वश्री रामदास धोत्रे, संजय भगत, घनश्याम वाळुंजकर, प्रकाश कर्डीले, माऊली व्हावळ यानी नियोजन केले. कार्यक्रमा साठी विश्‍वास्त सर्वश्री संजय व्हावळ, रमेश भोज, सोनवणे वाघचौडे, उबाळे उपस्थीत होते. 

    सदर संस्थेच्या या नियोजन व रेखीव कार्यक्राची दखल इतर संस्थेने घ्यावी. समाजासाठी तळमळ असणारे उच्च पदावर जाऊन सुद्धा समाजाची जाणीव ठेवणारे जे बांधव असतात त्यांना समाज मातेची माया ही गरूड झेप घेण्यास प्रेरीत करते. हा विचार उपस्थीत बांवांनी व्यक्त केला. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya