Bride / Groom Form

अहमदनगर येथे तेली समाज वधू - वर परिचय मेळावा व सामुहिक विवाह सोहळा संपन्न.

30 June 2009 teli samaj vadhu var melava 159 views

     अहमदनगर :- जिल्हा तेली समाज महासभा आयोजित व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट अहमदनगर यांचे सौजन्याने श्री. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह कै. नारायणराव देवकर सभागृह अहमदनगर येथे रविवार दि. १० मे २००९ रोजी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचयवसामुदायिक विवाह संस्कार सोहळा हजारो स्नेहीजनांच्या उपस्थितीत पार पडला. हा मेळावा अनेक दृष्टीने अर्थपूर्ण ठरला. वधू-वर परिचय वधू-वर सामुदायिक विवाह. सर्व जाती समभाव - राष्ट्रीय एकात्मता, तसेच दि. १० मे हा जगभर मातृदिन म्हणून साजरा होतो म्हणून वृद्ध मातांचा गौरव करुन मातृदिन साजरा झाला. स्त्री शक्ती दगा शक्ती याचे प्रतिक म्हणुन महिलाना सुद्धा स्टेजवर स्थान देवून गौरविण्यात आले. सकाळी ११ वा. प्रमुख पाहणे मेळाव्याचे अध्यक्ष श्री.संभाजीराव जाधव, उद्घाटक नगरशेठ श्रीमान लक्ष्मणरावजी देवकर, शिवसेनेचे आ. अनिल भैय्य राठोड, माजी नगराध्यक्ष श्री. अरूण काका जगताप (समाज इतर पाहुणे) व समाजातील इतर पाहुण्यांचे उपस्थितीत मेळाव्यास सुरुवात झाली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar