वधू - वर फॉर्म

तेली समाजाची वाघीण इतिहास संशोधक प्रतिमाताई परदेशी . हेच महापुरुषांच्या रक्ताचे आणि विचारांचे खरे वारसदार-

18 September 2015 Teli samaj 102 views

    आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवशाहीचा-बहुजनांचा खरा इतिहास पोहचला,भारताच्या इतिहासात प्रथमच कुठल्या पुरस्कराविरोधात जनतेत इतका आक्रोश,संताप चीड़ बघायला मिळाली नसेल,पण यानिमित्ताने एक मात्र साध्य झाले,सत्य लोकांपर्यंत पोहचले,बहुतांश समाज खड़बडून जागा झाला,याचे पूर्ण श्रेय जेष्ठ पत्रकार,आपल्या रोखठोक बोलण्याने समोरच्या श्रोत्यांची नेहमीच मने जिंकणारे,निर्भीड,बिनधास्त,सत्यशोधक ज्ञानेश महाराव सर,शिवमर्द,सर्व महाराष्ट्राने स्वीकारलेले नेतृत्व,सर्वांचे लाडके आमदार जितेंद्र आव्हाड साहेब, प्रचंड तळमळ असणारे,जिद्दी,प्रामाणिक,विचारांसाठी अविरत झटणारे,रक्त आटवत-हाडे झिजवत हा विचार पोहचवणारे आदरणीय श्रीमंत कोकाटे सर,स्त्रीशक्ति काय करू शकते हे उभ्या महाराष्ट्राने ज्या नारीच्या रूपाने अनुभवले, त्या तेली समाजाच्‍या रणरागिनी प्रतिमाताई परदेशी...

    महापुरुषांना रक्ताचे नव्हे विचारांचे वारस असतात,पण आज उभा महाराष्ट्र म्हणतोय ज्ञानेश महाराव सर, जितेंद्र आव्हाड साहेब,श्रीमंत कोकाटे सर,प्रतिमाताई परदेशी तुम्हीच आहात महापुरुषांच्या रक्ताचे आणि विचारांचे खरे वारसदार, तुम्ही पेटवलेली ही विचारांची मशाल आता वणवा बनून पेटल्याशिवाय राहणार नाही,महाराष्ट्र तुमचे उपकार कधीच विसरणार नाही...

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu