तेल्यांच्या किती महिला खासदार किंवा आमदार आहेत ?
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 2 ) एप्रिल 2010
इतिहासात फक्त समाजमाता काकुच तेल्यांच्या पहिल्या व शेवटच्या खासदार व आमदार महिला होऊन गेल्या. त्या सुद्धा स्वत:च्या बळावर पक्षाच्या किंवा समाजाच्या नव्हे. गेली १०/१२ वर्ष लोकसभा महिलांना आरक्षण असावे असे वातावरण तापु लागले भाजपा हा ब्राह्मणी विचारांना राबवणारा पक्ष नरेंद्र मोदी जन्माने तेली असेल ? कारण या तेली बांधवाने तेल्या साठी काहीच केले नाही. कर्माने ब्राह्मणवादी असल्याने मोदी सहीत कुणीच महिला आरक्षणात ओबीसी आरक्षण असावे हे पसरवले नाही किंवा विरोधी सुर लावला नाही. याच भाजपाने मंडलचे वादळ सुरू झाले त्या वेळी बाबरी पाडावयास सुरूवात केली व मंउल वादळ संपवीण्यासाठी यांचे सगे सोबती कोर्टात जावुन मंडलला थांबवून बसले आणि या पक्षाची चाकरी करणारे हे कधीच समजुन घेत नाहीत . महिलांना आरक्षण द्या म्हणनारे हे ओबीसींना त्यातील तेल्यांना आरक्षण म्हणताच वेगळी दिशा का देतात. इथे एक मला नमुद करावे वाटते राजर्षी शाहु महाराज म्हणाले होते. नेता तुमच्या समाजातला असावा त्याला समाजाच्या सुख दु:खाची जाणीव असेल. भाजपाला प्रेम आहे ते मध्ययुगीन भारताचे की जेंव्हा खोटा देव उभा करून किडा मुंगी सारखे तुम्ही जगा हा आदेश देत होता. आणि याच साठी ते निर्णय प्रक्रियेत दुसऱ्यांना येऊ न देता वावरत असतात. त्याचे एक उदाहरण महिला आरक्षणात ओबीसी नकोत, तेली नकोत. महाराष्ट्रात हा कायदा पास झाला तर ४/५ महिला तेल्यांच्या सहज आमदार होतील पण तेली नको ओबीसी नको ही भाजपाची खरी ओळख आपण करून कधी घेणार. काँग्रेस आम आदमी हा मुखवटा आहे. कालचा गरिबी हटावा ही जशी बनवेगीरी आहे तशीच काँग्रेसच्या स्थापने पासुन ती कसोशीने प्रयत्न करते आम्ही धर्मवेडे, जातीयवादी नाही. परंतू भाजपा वाल्या सारखीचे काँग्रेस ही ओबीसींची खरा शत्रु आहे. नेहरू पंतप्रधान असताना आयोग कालेकर सारखे बुजगावणे उभे केले. भारतीय घटने. प्रमाणे मंडल आयोग नेमला जनता दलाच्या काळात. रिपोर्ट सादर झाला काँग्रेसच्या काळात तो त्यांनी दडवून ठेवला पण- भांडवलशाहीला रान मोकळे करून देऊन मंडलच्या समुद्रातील चिमुटभर देऊन आता आणला आमा आदमी चेहरा. अर्जुनसिंग मानव विकास मंत्री असताना त्यांनी ब्राह्मणी डोक्याला हा एक फार मोठा हादरा होता. त्यांनी अर्जुन सिंगाना घराचा रस्ता दाखविला. ब्राह्मणी विचार हीच प्रणाली काँग्रेस मधल्या ब्राह्मण वादाने गुप्त राबवली म्हणुन महिला आरक्षणात लोकसभेत ओबीसी नकोत. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेच्या आपल्या ध्येयाला दुर सारल्या नंतर त्यांनी ब्राह्मणी प्रणाली आपली केली. यामुळेच प्रथम पासुन ओबीसींच्या आरक्षणाला त्यांचा कडाडून विरोध. बाबरी पाडायला, मुसलमानाच्या विरोधात दंगली करावयास ओबीसी पाहिजे. तेली पाहिजे पण त्यांचा वाटा म्हणताच लगेच वेगळी दिशा का ? यांच्या ही जवळ वावरणाऱ्या ब्राह्मणी विचारानी त्यांना ग्रासले आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे हे एक ढोंग आहे. तिला राष्ट्रवादी न म्हणता मराठावादी काँग्रेस म्हणने फार योग्य आहे. ओबीसीतले मोजके नेते उभे राहिले ओबीसी स्थानिक संस्थेत सत्तेत भागीदार होतीय म्हणताच कुटील डाव पेच खेळुन सत्ते बाहेर मराठा चळवळी उभ्या करून बाहेरून दबाव गट निर्माण करण्याचे नाटक करून मराठा हे सुद्धा ओबीसी हे पटवू लागले. गरिब मराठे व ओबीसी यांच्यात भांडणे लावून सत्तेची दारे आपल्या सोईचे करू लागले. आणि या सर्व जात दांडग्या व ब्राह्मण प्रणालीने ओबीसी, तेल्यांचे लचके प्रतिष्ठेने व सन्मानाने तोडत आहेत.
