Bride / Groom Form

गरीब व गरजु लोकांसाठी धर्मार्थ चिकीत्सा आणि दंत चिकीत्सालयाचे उद्घाटन.

01 February 2011 Teli samaj 96 views

एप्रिल 2010

     पुणे :- कै. डॉ. भाऊसाहेब सहिंद्रकर चॅरीटेबल ट्रस्टच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच ज्येष्ठ अभिनेते श्री, जयराम कुलकर्णी व अभिनेते श्री. विजय मिश्रा यांच्या हस्ते श्रीमती सुमन सहिंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारनगर नं. १ येथील तळजाई वसाहतीतील गरीब व गरजू लोकांसाठी धर्मार्थ क्षेत्र चिकीत्सा आणि दंत चिकीत्सालय सुरू करण्यात आले या उद्घाटनानिमित्त मा. नगरसेवक श्री. सुभाष जगताप, डाँ संजय जगताप, डॉ. अजित वहीकर, डॉ राजेश खाबडे, श्री. दादा जामखेडकर इ. मान्यवर उपस्थित होते.

     या धर्मार्थ नेत्र चिकीत्सा व दंत चिकीत्सासाठी डाँ रविंद्र मोरे, डॉ. सुनिता मोरे, डॉ. शरद अग्नीहोत्री हे डॉक्टर्स चिकीत्सा करणार आहेत. गरजू व गरीब रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन के, डाँ भाऊसाहेब सद्रिकर ट्रस्टचे अध्यक्ष मा. डॉ. प्रकाश सहिंद्रकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

     या ट्रस्टच्या माध्यमातुन १९८७ सालापासुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जतात. विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, लसीकरण, वृक्षारोपण, रक्तदान, क्रिकेट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांसारखे नवनवीन उपक्रम राबविले जातात.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story