भोर तेली समाजाचे आधारवड श्री. रामचंद्र बाबुराव शेडगे.
भोर जवळील उतरली गावात थोडीच शेती. उमेदीच्या काळात कमी शिक्षणावर नोकरी हि मिळवणे कठीण वणवण करीत फिरण्या पेक्षा ओळखीण भोर नगर पालीके जवळच्या बहिरट यांच्या गजानन प्रेस मध्ये खिळे जुळवू लागले. खिळे जुळवता जुळवता छपाई तंत्र ही आत्मसाथ केले. या वेळी प्रेस मधील सोबत्या बरोबर चर्चा केली. आपण ही अशी च प्रेस सुर करू भांडवलचा प्रश्न उभा रहिला. त्यातुन मार्ग काढत काढत भर बाजारपेठेत श्री राम प्रेस उभी राहिली प्रेस सुर करणे सोपे होते त्याही पेक्षा कठिण चालविणे होते. कामे मिळवणे, वेळेत काम पुर्ण करणे मुळात ह्या व्यवसायतील महत्वाचा भाग म्हणजे पैसे वसुल करणे. त्यात भर म्हणजे त्या काळात प्रत्येक अक्षराचा एक खिळा असे तो जुळवणे पुन्हा छपाई होताच खिळे सोडवणे या किचकट कामात वेळ जात आसे. परंतु जोडीदार बरोबर हे दोघे ही कामगार व मालक झाले. यामुळे थोड्या दिवसात श्री राम प्रेस भोर परिवराची पहिली पसंत ठरू लागली.
काळ बदलू लागला तंत्रज्ञान बदलू लागले. या बदलत्या तंत्रज्ञाना मुळे खिळे जुळवणे कालबाह्य झाले. शेडगे तंत्रज्ञानाला अज्ञापल करू लागले. याच दरम्यान भागीदारी संपन्याची वेळ आली आता पुढे वाटचाल करावयाचिी जुन्या जागे जवळ जागा घेऊन त्याच श्री रामाच्या नावाने 200 मध्ये उभे राहिले. कामाच्या दर्जावर लक्ष गिर्हाकावर लक्ष, वेळेवर लक्ष या मुळे व्यवसायाला उभारी येऊ लागली दहा पंधराची ऑफसेट मशीन घेतली. परंतु यावर ही समाधानी न रहाता फोर कलक्षर मशीन घेतली गेली 40 वर्ष अविरत कष्ट घेऊन व्यवसायाला जन मानसात प्रतिष्ठा निर्माण केली. शेडगे याना दोन मुले श्री. गणेश, श्री. राजेश, श्री गणेश ह प्रेस मध्ये लक्ष देऊ लागले नव विचार नवी दिशा, नवे रस्ते यातुन गती मिळाली. घरी शेती होती. त्या शेतीत भांडवल गुंतवले श्री. राजेशन त्यात लक्ष दिले. शेतीला जोडधंदा म्हणुन पहिल्या एका दोन म्हशी होत्या. एक एक करित गोठ्यात 40 म्हशी आल्या. हा व्यवसाय अधीक किफायतशीर पण कधी इथे ही तंत्रज्ञान प्रगत झालेले. या तंत्रज्ञानाचा प्रयोग केला तर मनुष्य बळाचा कमी वापर नुकसानीची कमी हमी या बळावर अधीक फायदा हेसमजु लागले सर्व गोष्टींचा अवलंब करून प्रगत गोठा तयार केला. या मुळे विक्री साठी 200 लिटर दुध मिळते. ते मार्केटिंगला पाठवणे. श्री. शेडगे यांनी प्रेस मध्ये खिळे जुळवणे बाईडिंग करण यापसुन जीवनाची सुरवात केली. स्वत:च्या पायावर चालताना नवीन क्षितीज दिसू लागली त्या क्षितीजाकडे गरूड झेप घेताना पेट्राल पंप असावा हे दिसू लागले. या ही क्षेत्रात उडी घेतली. आ भोर परिसरात स्वत:चा पेट्राल पंप ते चालवत आहेत.
पैसा घामातुन येतो ह सत्य जवळ ठेवन ते चालले भोर येथे समाजाची संस्था उभी करण्यात सहभाग आज ते या संस्थेचे संचालक आहेत उतरवली या ग्रा. पं. तीचे सदस्य म्हणुन ही काम करु शकले आहेत. भोर तालुक्यातील व्यवहारीक मंडळींच्य अडचनी साडवणारी भोर तालुका व्यापारी असोशीयन या संस्थेचे खजीनदार म्हणुन कार्यरथ आहेत. उत्कष्ट नियोजन, अभ्यासपुर्वक कार्यवाही नवीन तंत्रांचा अभ्यास. जे नवे ते आपन स्विकारावे ही जडण घडण असल्यामुळे दुध प्रक्रियेतील अदर्श गोपाळ परस्कार त्यांना 2003 मध्ये मिळाला आहे. त्यांचे चि. गणेश हे पुणे जिल्हा तेली महासभा पश्चिमचे उपाध्यक्ष आहेत. समाजाच्या वेदनांचा ठावठिकाणा लागला समाजाच्या प्रगतीला गतीयावी यासाठी समाजाची जणगणना करण्यास ते जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन सर्वाने बरोबर होते. 2015 मध्ये झालेल्या यशस्वी कार्यक्रमात त्यांची सर्वा बोबर यशस्वी धडपड ही मोठी होती. एक धडपड व विचार पुर्वक वाटचाल म्हणजे
