वधु - वर फॉर्म

प्रा. वसंतराव कर्डिले यांचा अमृत महोत्सव

23 October 2015 Other 83 views

    नाशिक, दि. २ (प्रतिनिधी) - आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला स्वत:ला एक दिशा मिळाली आहे. या पुढील समाजकार्य करताना प्रा. कर्डिले यांची प्रेरणा नेहमीच पाठीशी राहील, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रा. वसंतराव कर्डिले यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्या प्रसंगी केले.
    ज्येष्ठ अभ्यासक, सेवानिवृत्त प्राध्यापक वसंतराव कर्डिले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आज (दि. २) महाकवी कालिदास कलामंदिर येथे भव्य अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ना. बावनकुळे म्हणाले की, जगात काही मिळवायचे असेल, तर युवकांनी त्यांचे ज्ञान मांडता येईल, असे कौशल्य विकसित करावे. संघटन होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. प्रा. कर्डिले यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आपण थोडेसे घेतले, तरी आपले जीवन समृद्ध होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी प्रास्ताविक केले. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रा. वसंतराव कर्डिले व शकुंतला कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. छगन मुळे संपादित प्रा. कर्डिले यांच्या जीवनावरील 'वसंतोत्सव' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच तैलिक महासभा डॉट कॉम या संकेत स्थळाचेदेखील अनावरण करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना प्रा. कर्डिले म्हणाले, मी समाजासाठी योगदान देऊ शकलो म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो तसेच शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी काम करत राहील. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे उपमहापौर आबा बागूल, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप, आ. शिरीष चौधरी, माजी महापौर अँड़ यतीन वाघ, त्र्यंबकेश्वरचे उपनगराध्यक्ष संतोष कदम आदी उपस्थित होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, आर. टी. चौधरी, संताजी मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, जिल्हाध्यक्ष डॉ. शरद महाले, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चांदवडकर, भानुदास चौधरी इत्‍यादी उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir