Bride / Groom Form

कै. सहादु गोविंद कोटकर, श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1986

27 April 2020 Teli samaj 75 views

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

     जन्म नगर, शिक्षण बेताचे शरीर यष्टी सडपातळ बोलण्यात काटकपणा लहानपणा पासून कष्ठाळू वृत्ती. त्‍यांच्‍या पत्नी ठकबाई त्यांचे बरोबर काम करुन सहाय्य त्यामुळे धंद्यात आर्थिक बचत. तेल घाण्याचा व्यवसाय व हळद विकण्याचा धंदा म्हणून त्यांना हालदे या नावाने हाक मारीत. त्यांना चार मुलगे व तीन मुली असा परिवार पहिला मुलगा कै. सावळेराम सहादु व नंबर चारचा मुलगा गणपत सहादू यांचे यांत्रीक कामात लक्ष त्यांनी नगरमध्ये प्रथमच यंत्राव्दारे तेल तयार करण्याचे कार्य केले.

    त्यामुळे यांना साथ नंबर तीनचे बंधू रंगनाथ सहादु यांचे सहाय्य व लक्ष असल्याने कामात प्रगती नंबर दाेनचे हे घाण्याचे सुतार काम करीत होते. कै. सहादु कोटकर हे दारुणकर (कारभारी) यांचे जवळचे नाते-संबध त्यामुळे समाज पचायतीत नेहमी भाग घण्यात अग्रसर.

   त्यांची पत्नी श्रीमती ठकूबाई यांचा ८ जानेवारी १९८६ रोजी समाजातील वयोवृद्ध महिला म्हणून सुवर्ण महोत्सवांत सत्कार करण्यात आला व यांना चांदीची मुद्रा देण्यात आली. कै. सहादु कोटकर यांच्या मुलांना लहानपणी चांगले मार्गदर्शन केलेले असल्याने आज एकाच घरांत राहुन तेलाचा व्यवसाय उत्तम रितिने करतात. सर्जपरा या भागात त्यांचा व्यवसाय चांगला आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi