वधु - वर फॉर्म

प्रभाकर रंगनाथ नागले, आदर्श शिक्षक, श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव

26 April 2020 sant santaji maharaj jagnade 87 views

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्य तिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

    अहमदनगर जिल्हा परिषद गौरवकृत आदर्श शिक्षक प्रभाकर रंगनाथ नागले उपाध्यापक, म. गांधी विद्यालय, प्रवरानगर

     यांचा जन्म ५ जून १९४५ रोजी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे झाला. वडील आणि थोरले बंधूपासून शिक्षकी पेशाचा वारसा लाभला. १९६५ पासून रयत शिक्षण संस्थेच्या कोळपेवाडी व प्रवरानगर येथील माध्यमिक प्रशालांमधून शिक्षक म्हणून सेवा.  बालपणी घरची परिस्थिती तशीच जेमतेमच, परंतु स्वतः अत्यंत प्रयत्नवादी व हरहुन्नरी आहेत.

   नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व स्काऊट गाईड चळवळीतील एक निष्ठावान व धडाडीचे कार्यकर्ते असून सामाजिक वनीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम शालासमूह योजना, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांचे दिग्दर्शन, हिंदी, संस्कृत व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस मोठया संख्येने विद्यार्थी बसवून त्यांना विनामूल्य मार्गदर्शन व वृत्तपत्रातून अनेकदा स्तंभ लेखन करून समाज प्रबोधन या सारख्या अनेक महत्वपूर्ण क्षेत्रात भरीव कामगिरी त्यांनी केली आणि म्हणून ५ सप्टेंबर ८५ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेने त्यांची 'आदर्श शिक्षक' म्हणून निवड केली. सन्मान पत्र व ताम्रपट देऊन खासदार माननिय यशवंत राव गडाख यांचे शुभ हस्ते त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला.

   याच संदर्भात २५ फेब्रुवारी १९८६ रोजी शिक्षक आमदार माननीय रा. ह. शिंदे यांचे शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्य स्काउट कमिशनर माननीय पोपटरावजी ठुबे यांचे अध्यक्षतेखाली जिल्‍हा स्काऊट गाईड संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला.

   अनेक मासिकांचे त्यांनी संपादक म्हणून काम केले. १९८४-८५ या वर्षी त्यांच्या शैक्षणिक निबंधाला जिल्हा परिषदेच शंभर रुपयांचे पारितोषिक मिळाले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj