वधु - वर फॉर्म

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव स्‍मरणिका सन 1986 प्रभाकर रंगनाथ नागले अहमदनगर जिल्हा परिषद गौरवकृत आदर्श शिक्षक

25 April 2020 Teli samaj 12 views

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)

      प्रभाकर रंगनाथ नागले, नगर जिल्हा परिषद गौरवकृत 'आदर्श शिक्षक' म. गांधी विद्यालय, प्रवरानगर, ता . श्रीरामपर. जि. अहमदनगर १० जानेवारी १९८६ सन्माननीय अध्यक्ष,

     तिळवण तेली समाज ट्रस्ट, अहमदनगर सप्रेम नमस्कार वि. वि.

     महाशय, 

    आपण आपल्या तिळवण तेली समाज ट्रस्ट च्या वतीने संत श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्ताने सुवर्ण महोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहाने आणि नियोजन बद्ध रीतीने पार पाडला. हा कार्यक्रम बघून मीच काय सर्व समाज बांधव अत्यंत प्रभावित झाला आहे.

   या प्रसंगी आपण महाराष्ट्राचे भूतपूर्व राज्य मंत्री आणि जगदंबा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय आबासाहेब निंबाळकर यांचे शुभ हस्ते समाजातील ६० ते ८० वयोगटातील वयोवृद्ध कार्यकर्त्यांचा सत्कार केला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार केला.

    अहमदनगर जिल्हा परिषदेने माझा माझ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ५ सप्टेंबर ८५ रोजी खा. यशवंतराव गडाख यांचे शुभहस्ते ताम्रपट, शाल, श्रीफळ व प्रशस्ति पत्रक देऊन गौरविले आणि त्यामुळे आपणही माझा उपरोक्त कार्यक्रम प्रसंगी 'चांदीचे स्मृचिन्ह' देवून सत्कार केला. खरोखरच ज्या समाजात मी जन्मलो वाढलो त्या समाजाने केलेला हा सत्कार मला अत्यंत मौलिक वाटला. इतर अनेक व्यक्ती आणि संस्था यांनी माझे अनेकदा सत्कार केले परंत मातेच्या ममतेने समाजाने म्हणजेच आपल्या ट्रस्टने केलेला सत्कार हा अवर्णणीय व अविस्मरणीयच.

    आपण आपल्या ट्रस्टच्या वतीने वयोवृद्ध कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन घेऊन गुणवान कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करुन समाजसेवेचे व्रत अत्यंत जिद्दीने व कुशलतेने पार पाडीत आहात. आणि या सुवर्ण महोत्सवी समारंभ प्रसंगी आपण संपूर्ण नगर जिल्हयातील समाज बंधू-भगिनींना एकत्र आणून त्यांच्या मनातील मरगळ नष्ट करून जोमाने समाज बांधणी व समाज सेवेची नव्याने प्रेरणा दिली.

   आपण हाती घेतलेले समाज सेवेच्या या महत्त्वपूर्ण कार्यास अधिकाधिक गती येण्यासाठी आपण जिल्हाभर हिंडून गाव पातळीवर व तालुका पातळीवर मेळावे घ्यावेत. मार्गदर्शन करावे आणि संघटना मजबूत करुन आपल्या ट्रस्टला पूरक शाखा स्थापन केल्यावर समाजाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या विकासाच्या दृष्टीने आपल्या सर्व योजना कार्यान्वित करणे सोयीचे होईल. असो

   या प्रसंगी मी माझ्या सत्काराचे संदर्भात आपल्या ट्रस्ट बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन आपले मनःपूर्वक आभार मानतो व असे आश्वासन देतो की, समाज बांधणी, समाज प्रबोधन आणि यासारख्या कोणत्याही कामकाजासाठी मी आणि समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन अपले हात बळकट करु. आपण केव्हाही बोलवा, आम्ही आपल्या समाज सेवेच्या कार्यासाठी उपस्थित राहू. सत्काराबद्दल पुन्हा एकदा आभार!
 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu