वधु - वर फॉर्म

संत संताजी पालखी सोहळा व विद्रोही तुकाराम

22 April 2020 sant santaji maharaj jagnade 51 views

ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद  ?( भाग  6) , ऑक्‍टोबर  तेली  गल्‍ली  2009 

     मी संत संताजींचा विचारवंश आहे याचा अभिमान बाळगतो आणि कर्तव्याची जाणीव ही ठेवतो. मग तो अभिमान बाळगताना कुणाशी शाब्दीक दोन हात करावयास मिळणे हे माझे भाग्य समजतो. ब्राह्मणी संस्कृतीच्या मनुस्मृती विचार वंशाने आपल्या खांद्यावर हात ठेऊन पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याची ही तोंड ओळख. तीच गत मराठा समाजातील मंडळींनी केली आहे. मी मराठे आपले भाऊ आहेत का ? या माझ्या खळबळजनक पुस्तकात सामाजीक, राजकीय, आर्थिक छळवणूक मराठ्यांनी कशी केली ते मांडले आहेच. अधिक माहिती हवी असेल तर सन २००८ मधील तेली गल्लीचे अंक वाचा. आज मी इथे फक्त संत संताजी विषयी मराठा प्रेम मांडत आहे. एका गरिब तेली कुटूंबात जन्मलेला इंदोरी, ता. मावळ येथील ह.भ.प. धोंडीराम राऊत हे व्यवसायाने पोष्टमन होते. पण वृत्ती धाडसी होती सर्व संत पालखीतून पंढरीला जातात. संत संताजी फक्त तेली समाज पातळीवर सुदुंबऱ्यात थांबतात असे न होता संताजी महाराष्ट्र भक्ती सागरात जावेत. ते लोक मनातून पंढरीला जावेत ही धडपड सोबत्यांना घेऊन सुरू केली तेंव्हा. धोंडीराम राऊत देहू संस्थान प्रमुखांना भेटले. आणि संत तुकाराम व संत संताजी यांचे नाते सांगून संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात सामील होण्यास परवानगी मागितली पण या संस्थानाने ती परवानगी नाकरली. या मागचा विरोधी पणा आपण समजून घेतला पाहिजे. संत तुकाराम व संत संताजी या नात्याचा प्रभाव तेली बांधवांनी अधिक प्रभावी केला तेंव्हा कुठे या मंडळींना कधी कधी नोंद घ्यावी वाटते. पण हा वर वरच प्रेम आहे. नाहीतर नागपूर येथील श्री. मधुकर वाघमारे यांनी संत तुकारामांच्या समाधी स्थळी दिलेली संत संताजींची प्रतिमा सन्मानाने लावली असती. दुसरी एक घटना नमुद करतो प्रा. अह. साळुखे यांना पुरोगामी मंडळी कितीही डोक्यावर घेत असले तरी एक प्रश्न उरतोच. हे प्रा. साहुंखे आपल्या विद्रोही तुकाराम पुस्तकात खऱ्या अर्थाने त्यांनी तुकोबांच्या विद्रोहाला मोकळी वाट करून दिली आणि मनुस्मृतीच्या विचार वंशाची बिंगे चव्हाट्यावर मांडली असली तरी त्यांनी एक गोष्ट लपवून ठेवली. त्यांनी आपल्या भल्या मोठ्या पुस्तकात एक शब्दाने ही संत संताजींना स्थान दिले नाही. त्यांनी दिले नाही मी शोधले नाही. ब्राह्मण व मराठा समाजाची तिरकी वाट आमचे बुड नसलेले पुढारी आपल्या मोठे पणासाठी सोईस्कर स्वतःचा बचाव करतात. पण त्यांच्याकडे आशेने पहाणाऱ्या समाजाला वाऱ्यावर सोडून देतात. यांना संत संताजीचे विचार वंश म्हणावे का? कारणा त्यांची कृती ही खरा इतीहास दडपणारी आहे. हे भविष्यात चालणार नाही एवढी ताकद संताजी विचाराची आहे. 

जय संताजी!

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang