वधू - वर फॉर्म

धुळे तेली समाजाचे माजी अध्यक्ष शांताराम उखडू चौधरी यांचे निधन

01 September 2020 Teli samaj 90 views

     धुळे तेली समाजाचे माजी अध्यक्ष तथा कुसुंबा येथील रहिवासी शांताराम उखडू चौधरी यांचे हृदय विकाराने निधन झाले. शिरपूर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. छाया शामकांत ईशी यांचे ते वडील तर महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी याचे सासरे व पुणे येथील खान्देश तेली समाज मंडळाचे संस्थापक विश्वनाथ उखडू चौधरी, कुसुंबा येथील दिलीप चौधरी, रविंद्र चौधरी यांचे बंधू होत. धुळे पंचायत समितीच्या माजी उपसभापती श्रीमती बेबीबाई वसंतराव चौधरी यांचे जेठ, अनिल व प्रदीप चौधरी यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, ३ मुली, जावई, ३ भाऊ, वहिनी, नातवंडे असा परिवार आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar