वधु - वर फॉर्म

नारायणगाव तिळवण तेली समाज व सुदिप कसाबे यांंचा मदतिचा हात

07 May 2020 sant santaji maharaj jagnade 56 views

     नारायणगाव तिळवण तेली समाजाचे सामाजिक कार्यातील गौरवास्पद कार्य व सुदिप भाऊ कसाबे यांच्याबद्दल गर्व गरिब व गरजूलोकांना मदतीचे कार्य चालू असताना सुदीपभाऊ कसाबे यांच्या पुढाकाराने गरिबांसाठी मदत म्हणून ५१०००/- रु. च्या ७०० तेलाच्या बाटल्या लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट व तिळवण तेली समाजामार्फत नारायणगाव ग्रामपंचायतीस सरपंच श्री.बाबुभाऊ पाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष महेशभाऊ वालझाडे, उपाध्यक्ष सुदीपभाऊ कसाबे, अनिलतात्या दिवटे, तुषार दिवटे, प्रणव भुसारी, बाळासाहेब दळवी, संजय कसाबे उपस्थित होते या अगोदर १००० किलो गहू आणि ३०० किलो तांदूळ सुदीपभाऊ कसाबे यांनी महासूर्योदय मित्र मंडळामार्फत जमा केला आहे. आपले काम उल्लेखनीय चालले असून आपल्या या बहुमूल्य कामाबाबत सरपंच बाबुभाऊ पाटे यांनी सुदीप भाऊंचे विशेष कौतुक केले, नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले आणि पुढील कामासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

Narayangaon tilvan teli samaj helping people in covid 19

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya