Bride / Groom Form

मराठा तेली समाज विकास मंडळाचा अभिनव उपक्रम तेली समाजातील संताजी जगनाडे महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या विषयी माहीतीवर आधारित प्रश्नमंजुषा

11 July 2020 sant santaji maharaj jagnade 77 views

     संताजी जगनाडे व एकनाथ महाराजांचा इतिहास तेली समाजात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहीती व्हावा या अनुशगांने ही प्रश्नमंजुषा तयार केली आहे , समाजाचा प्रचार व प्रसार व्हावा, संताजीची ओळख ही घराघरात पोहचावी, आजही बरेच व्यक्तीला आपल्या समाजाचे दैवत कोण आहे, यांची माहीती नाही ,ही कल्पना लक्षात घेत ही प्रश्नमंजुषा मंडळाचे संचालक प्रा.स्वप्निल वि.खेडकर यांनी तयार केली.

    समाजातील सर्वच श्रेञातील व्यक्तींनी या उपक्रमा मध्ये सहभाग नोंदविला व सक्रिय सहभाग घेणाऱ्या व्यक्तीला अभिनंदन पञक देऊन गौरविण्यात आले.समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त श्रीरसागर ,खा.रामदासजी तडस तसेच समाजातील अनेक मान्यवरांनी या अभिनव उपक्रम चे कौतुक केले.

    यासाठी मंडळाचे अध्यक्ष चन्द्रकांत मेहरे ,उपाध्यक्ष प्रा.डॉ.संजय तिरथकर यांचे मार्गदर्शन लाभले, उपक्रमाच्या यशस्वी ते साठी गजानन बाखडे ,सजंय रायकर, नितीन बाखडे, यशवंत चतुर, दिपक व्यवहारे ,अशोक मांगलेकर ,प्रा.स्वप्निल खेडकर, रमेश बोके, उल्हास ताकपिरे, तुषार गिरमकर , राजू काळे , प्रकाश तिडके , चेतन सरोदे ,पंकज डहाके, पंकज माहोरे यांनी विशेष प्रयत्न केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं