वधु - वर फॉर्म

मंडलला गाडणार्‍या कमंडलची नवी चाल म्हणजे ओबीसीत प्रवेश.

24 October 2015 O.B.C. 1 views

ब्राह्मण्य व मराठापण यांच्या टाचे खालील ओबीसी. (भाग 4) -

 मोहन देशमाने,उपाध्‍यक्ष, ओबीसी सेवा संघ

    मंडल नेमल्या नंतर जय प्रकाश यांची क्रांतीच पोरकी करण्याची सुरूवात झाली. आगदी प्रथम ब्राह्मण्य सावध झाले यातूनच भाजपाचा जन्म झाला. ब्राह्मण्याच्या हितासाठी राममंदिर या साठी बाबरी उध्वस्त ती सुद्धा 6 डिसेंबर रोजी इतके भयानक षडयंत्र वापरले. आपले ब्राह्मण्य लक्ष साधण्यासाठी कमंडलवर लक्ष केंद्रीत करावयास लावले. या साठी काँग्रेस व भाजपा मधील ब्राह्मण्य पडद्या मागून एक होते. लढण्यासाठी ओबीसी होता. पण हाच ओबीसी आपल्या हाक्काच्या लढाई पासुन दूर कसा राहिल. मंडल कसा गोठावता येईल. मंडलचा लाभ कसा मिळणार नाही. आगदी याच साठी बापू, आम्मा, सद्गुरू हेच आपले उद्धारकर्ते संघर्षा पासुन दुर जाण्याची ही पाऊल वाट महामार्ग बनवला गेला व ओ.बी.सी. गाफील केला. मराठा, पटेल, जाट हे प्रगत समाज आज पर्यंत स्वातंत्र्यात संघटीत पणे यांनी राजकीय सत्ता उद्योग, सहकार, शैक्षणिक संस्था शासकीय नोकरी यात आपला सहभाग मोठा ठेवला मंडल मुळे त्याला धक्का बसताच विरोध ही केला. विरोधाने संविधान बदलत नाही. म्हणताच आम्ही ओबीसी आहोत. आम्हाला ओबीसी करा. आमचे हाक्क आम्हाला द्या. आमच्यात गरिब आहेत. या गरिबांना हाक्क द्या ही हाक देऊन रस्तयावर उतरणे. यासाठी या समाजातील सबळ झालेल्या बांधवांचा आर्थिक पाठिंबा यातुन अहिंसक मार्ग चोखळत हिंसक मार्गाने दबाव निर्माण करून ओबीसीत जाणे कायद्याने जमत नसेल तर उद्या संविधानातील आरक्षणाचा कायदाच आम्हाला मंजुर नाही मतदान मंजुर आहे पण आम्ही म्हणतो तसे नसेल तर आमचा हिसका हा मोठा असेल. या देशात मराठा व आशा समाजाने लोकशाहीच पायदळी तुडवली आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand