वधू - वर फॉर्म

तेली समाज वधू वर सूचक मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ. विना झाडे यांची नियुक्ती 

16 September 2020 teli samaj vadhu var melava 113 views

      चंद्रपूर :- अखिल भारतीय तेली समाज संघटना प्रणित वधूवर सूचक मंडळ चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष पदी बल्लारपूर येथील प्राध्यापिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. विना संजय झाडे यांची नियुक्ती अखिल भारतीय तेली समाज संघटन व वर वधू सूचक मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय दिलीपजी चव्हाण, मुख्य सचिव सचिनजी देशमाने व अन्य पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे. सौ.विना झाडे ह्या मोहसीन भाई जव्हेरी महिला महाविद्यालय बल्लारपूर येथे प्राध्यापिका पदावर कार्यरत आहेत तसेच संताजी महिला मंच बल्लारपूरच्या अध्यक्ष आहेत, अभिनव महिला मंडळ बल्लारपूरच्या सदस्य व इनरव्हील क्लब बल्लारपूरच्या सदस्य अश्या विविध सामाजिक संस्था मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. समाजातील सर्वसामान्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यात त्या आघाडीवर असतात. वधू वर सूचक मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवडीमुळे तेली समाजातील विवाहेइच्छूक तरुण तरुणींना सुयोग्य जोडीदार मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्या कडे आलेली आहे नेहमीप्रमाणे याही जबाबदारीला त्या योग्य न्याय देतील अशी सर्वांना खात्री आहे. सौ.विना संजय झाडे यांच्या नियुक्तीसाठी अखिल भारतीय तेली समाज संघटन व वर वधू सूचक मंडळ राज्य अध्यक्ष दिलीपजी चव्हाण, मुख्य सचिव सचिनजी देशमाने, संघटक राहुल जी भिसे, उपाध्यक्ष गणेश भिसे नागपूर येथील अरुणजी धांडे गोंदियाचे वासुदेवजी वंजारी, वर्धाचे प्रवीणजी सेलोकर किशोर साखरवाडे, राजेश कारमोरे, नागपूर जिल्हाध्यक्ष दीपिका जयपुरकर, तसेच रूपाताई कोपरकर, ज्योत्स्ना बाभुळकर, स्वातीताई येनुरकर, स्वातीताई बाभुळकर, विनोद बांगडे, हरीश जीसस अँकर प्रशांत घोडे, किरणताई दधे, हरीश ससनकर यांनी तसेच जिल्ह्यातील हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे व पुढील कार्यासाठी असंख्य शुभेच्छा दिल्या आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story