वधू - वर फॉर्म

जामखेड तेली समाजाने उत्‍साहात साजरी केली श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ३९६वी जयंंती

13 December 2020 sant santaji maharaj jagnade 110 views

       जामखेड : यावेळी जामखेड तालुका प्रातिक तेली महासभा संताजी युवा प्रतिष्ठान जामखेड तालुका प्रातिक तेली महिला महासभा समाजा तर्फे श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंंती जामखेड येथे विठ्ठल अण्णा राऊत यांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली. तसेच जामखेड तहसिल कार्यलय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सरकारी ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यलय, जामखेड नगरपरिषद या सर्व ठिकाणी उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. तसेच करोना च्या संकटामुळे व सोशल डिस्टन्सिंग चे वापर करून मोजक्याच नागरिकांन कडुन महापुजा चे कार्यक्रम पार पाडण्यात आले. तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉ. नितीन राऊत, विठ्ठल अण्णा राऊत, प्रशांत शिन्दे, आनंद भोज, संजय टेकाळे, सुरेश महाजन, क्षीरसागर, बाबासाहेब देशमाने, बापु टेकाळे, नितीन टेकाळे, रमेश क्षिरसागर, रमेश काळे, पप्पु टेकाळे, कल्पना राऊत, माधुरी क्षिरसागर,पन्हाळे मॅडम, सविता घोडके, उमा काळे यावेळी पुरुष व महिला मोठया संख्येने उपस्थित होते व कार्यक्रम पार पाडण्यात आले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir