वधु - वर फॉर्म

नविन नाशिक तेली समाज श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 15 views

      नविन नाशिक तेली समाज संचलित श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ, सर्वांगिणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज संतशिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती शासकीय नियमाने प्रतिमा पुजन, आरती, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे श्री बी जी दादा चौधरी व श्री विठ्ठलराव शेलार यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संताजी मंडळ नाशिक जिल्हा सरचिटणीस श्री राजेंद्र गवळी, मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव चौधरी, श्री रमेश चौधरी, युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश चौधरी, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ मनिषा मोरे, उपस्थित होते. 

new Nashik Teli Samaj Celebrate with enthusiasm shri sant santaji maharaj jagnade jayanti      कुमारी अनन्या कस्तुरे वय वर्षे ८ हिने संताजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाशझोत टाकला, तसेच श्री बी जी दादा चौधरी व सौ मनिषा मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे मंडळाचे उपाध्यक्ष श्री विनायक सोनवणे यांनी श्री संताजी महाराज यांचा जीवनपट उलगडुन सांगितला व समाज ऐक्य व संघटन किती महत्त्वाचे आहे याची जाणीव उपस्थितांना करून दिली.

     यावेळी मंडळाच्या वतीने मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव चौधरी, उपाध्यक्ष विनायक सोनवणे, सचिव श्री वसंतराव चौधरी, खजिनदार श्री नामदेवराव चौधरी, सहसचिव अर्जुन वेताळ, श्री किशोर चौधरी, श्री विनोद गणोरे , माजी अध्यक्ष श्री नितीन पवार सर, माजी अध्यक्ष श्री रघुनाथ चौधरी, श्री संदिप कोते, डॉ राम बोरसे, श्री रविंद्र चौधरी, श्री दिलीप चौधरी, श्री प्रदिप कोते, श्री कैलास चौधरी, श्री देहाडराय, श्री अमर व्यवहारे, श्री अनिल बागुल, श्री किरण वेताळ, अभिजीत बारगजे, शुभम नेरकर, अभिषेक सोनवणे, सुनिल ठाकरे, पप्पु चौधरी तसेच सर्वांगिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ मनिषा मोरे, सौ सरिता सोनवणे, सौ सुनिता बोरसे, सौ ललिता रत्नपारखी, सौ संगिता कोते, सौ संगिता पवार, सौ वर्षा वेताळ, सौ उषाबाई चौधरी, सौ. प्रमिला चौधरी, सौ कस्तुरे आदिसह मोठ्या प्रमाणात महिला  व समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी चहापान व नाश्ताची व्यवस्था श्री बी जी दादा चौधरी यांच्याकडुन करण्यात आली होती.

      कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव चौधरी,  श्री विनायक सोनवणे, श्री नामदेवराव चौधरी,  श्री वसंतराव चौधरी,  अर्जुन वेताळ, योगेश चौधरी, मोहित पन्हाळे यांनी परिश्रम घेतले. व श्री राजेंद्र गवळी यांनी आभार व्यक्त केले.
 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story