वधु - वर फॉर्म

सुदुंबरे येथे संताजी जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात.

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 53 views

     श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने श्री क्षेत्र सुदुंबरे येथील संत संताजी जगनाडे महाराज समाधीस अभिषेक आणि महापूजा, सुदुंबरे संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. यावेळी यावर्षीचा पुण्यतिथी उत्सवाचे अध्यक्ष जयंत राऊत आणि उद्घाटक सिद्धेश रत्नपारखी उपस्थित होते.

     कोरोना महामारी मुळे यावर्षी अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले त्यामुळे हा जयंती कार्यक्रम साध्या पद्धतीने आणि सर्व नियमांचे पालन करून करण्यात आला. याप्रसंगी सुदंबरे संस्थानचे कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी, मुख्य चिटणीस ऍड. राजेश येवले, खजिनदार दत्तात्रय शेलार, चिटणीस आप्पा शेलार, चिटणीस शैलेश मखामले, सुभाष कर्डिले, नागपूर येथील सुभाष घाटे आणि त्यांचे सहकारी समाज बांधव, सिने अभिनेते दत्ता उबाळे, नाना चिलेकर, धनंजय वाठारकर, सचिन काळे, संतोष काळे, ह.भ.प. बाळासाहेब काळे, विणेकरी ह.भ.प. आत्माराम बारमुख, वासुदेव उबाळे, इंदोरीचे माजी सरपंच सुनंदा राऊत, आदी समाज बंध भगिनी उपस्थित होते. या वेळी कोरोना महामारीचे जागतिक संकट लवकर दूर व्हावे आणि लस उपलब्ध व्हावी.अशी प्रार्थना संत संताजी जगनाडे महाराज यांचे चरणी करण्यात आली. अशी माहिती सुदुंबरे संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी दिली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava