वधु - वर फॉर्म

गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती संपन्न

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 20 views

     गडचांदूर:- गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संताजी जगनाडे महाराज चौकात प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोकराव बावणे यांनी भूषविले. बंडू भाऊ वैरागडे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. राजेश गायधनी यांनी आपल्या प्रास्ताविकात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.

      कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूर अध्यक्ष शंकरराव नागपुरे, कार्याध्यक्ष बांधकाम सभापती विक्रम येरणे, सचिव नत्थु जी शेंडे, तुषार कलोडे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम,कोवान कातकर, प्रा. मंगेश करंबे, राजुभाऊ मुळे,  दिपक वरभे, विवेक येरणे, प्रा. अनिल मेहरकुरे, बंडू भाऊ रागीट, राजेश देवगडे, तुषार बावणे, नागेश बावणे, अनंत येरणे यांनी परिश्रम घेतले. प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 नगर परिषद गडचांदूर

     स्थानिक नगर परिषदेच्या बिर्ला हॉलमध्ये संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी 8 डिसेंबर रोजी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जयंती साजरी करण्याचे दिशा निर्देश देण्यात आले आहेत.

     कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ  सविताताई टेकाम उपाध्यक्ष शरद भाऊ जोगी मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, बांधकाम सभापती व गटनेता विक्रम येरणे, आरोग्य सभापती जयश्री ताकसांडे राष्ट्रवादी काँग्रेस च्या गटनेत्या सौ. कल्पनाताई निमजे, शिवसेना गटनेता सागर भाऊ ठाकुरवार नगरसेवक राहुल उमरे, पापाय्या पोन्नमवर, धनंजय छाजेड, अरविंद मेश्राम सौ. अर्चना वांढरे, सौ. अश्विनी कांबळे सौ. मीनाक्षी एकरे, कार्यालयीन अधीक्षक अजिंक्य वणमोरे, कर अधीक्षक चरणदास शेडमाके सर्व विभाग प्रमुख व नगर परिषद चे कर्मचारी उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Oil Making