वधू - वर फॉर्म

देवळी तेली समाजच्‍या वतीने  संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 105 views

     देवळी शहरातीला मिरननाथ मंदिरमध्ये श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती विविधा सामाजिक संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी व देवळी तेली समाज यांच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूना अभिवादन करण्यात आले.

     जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या गाथा इंद्रायणी नदीत पाण्यात बुडविल्यानंतर अवघ्या तेरा दिवसात गाथा जशाच्या तशा लिहिणारे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मान्यावारच्या उपस्थितीत पार पडली.

Sant Santaji Jagnade Jayanti by Deoli teli Samaj     कार्यक्रमाच्या अध्याक्षस्थानी नगराध्यक्षा सुचिता मडावी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रा.नरेंद्र मदनकर, न.प.उपाध्यक्ष माजी नागर राध्यक्षा सरेश वा दय, नगर सेवक पत्रण महाजन, नगरसेविका सारिका लाकडे, भाजपा शहर अध्यक्ष रवि कारोटकर, निखील कावळे , शिवसेना प्रमुख महेश जोशी रवि कात्रे, पत्रकार गणेश शेंडे, किरण ठाकरे , विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष शरद आदमाने, बाबारराव कामडी, डॉ.अमोल गोमासे, नारायण सुर कार, किरण तेलरांधे, अविनाश कलोडे, विलास भुसारी, अमोल पवण आदींची उपस्थिती होती.

      कार्यक्रमाच्‍या यशस्वीतेसाठी शे खार मोरसकर, रामु इटणकर, राहुल डायरे, नीलेश कलोडे, भूषण कारगट कर समस्त संताजी उत्सव मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi