वधु - वर फॉर्म

संत जगनाडे महाराज प्रतिमा वाटपाचा शुभारंभ

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 77 views

         शिर्डी : राज्य शासनाने येत्या ८ डिसेंबर रोजी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचे आदेश शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर तेली समाजाच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक व संत शिरोमणी श्री जगनाडे महाराजांची प्रतिमा जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांना देण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शिर्डीत प्रांताधिकारी कार्यालयात विभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना प्रतिमा भेट देऊन करण्यात आला. यावेळी शिर्डी शहरातील जेष्ठ तेली समाजबांधव दत्तात्रय जगनाथ लुटे, ह.भ.प.यशवंतराव वाघचौरे, अॅड. विक्रांत वाघचौरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बद्रीनाथ लोखंडे, शिर्डी शहर अध्यक्ष रवींद्र महाले, धीरज व्यवहारे, विजय जंजाळ, अंजली कोते, अशोक गाडेकर, राजेंद्र पासवान आदी तेली समाज बांधव उपस्थित होते. प्रांत कार्यालया बरोबरच शिर्डी नगरपंचायत, साईनाथ माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक व मराठी शाळा आदी ठिकाणीही श्री संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand