वधू - वर फॉर्म

परभणी तेली समाजाच्‍या वतीने संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

15 December 2020 sant santaji maharaj jagnade 105 views

        परभणी - आराध्यदैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९५ वी जयंती नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे साजरी करण्यात आली या जयंती चे आयोजन येथील महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या जिल्हा शाखा परभणी च्या वतीनेकरण्यात आले प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत संत श्री संताजी जगनाडे महाराज याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण पुजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहूने मा.नगराध्यक्ष बंडु पाचलिंग व शिवलिंग खापरे हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात समाजातील काही बांधवाची समाज संघटनेच्या विविध पदांनवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला जिल्हा अध्यक्ष भास्करराव देवडे, सचिव निळकंठ राऊत, उप अध्यक्ष मनमथ देशमाने प्रसिद्धी प्रमुख किरण क्षीरसागर, महीला जिल्हा अध्यक्ष आशाताई नखाते, तालुक अध्यक्ष ज्ञानेश्वर सरकाळे ,आकाश भिसे शंकर फुटके, सुधिर सोन्नुनकर, पोत्रेकर स्वामी, युवक तालुकाध्यक्ष संतोष माने, कल्याण नखाते, महीला प्रतिनिधी डोंगरे, गाजरे, फूलमोगरे आदी समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र संचलन गोपाळ नगरसाळे यांनी केले तर व आभार प्रदर्शन दिपक शिंदे यांनी मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab