Bride / Groom Form

ओबीसी आरक्षणात ढवळा-ढवळ करू नका -माजी मंत्री क्षीरसागर

20 February 2021 O.B.C. 109 views

विजय चौधरी यांची महाराष्ट्र प्रांतिक तेली सभेच्या अध्यक्षपदी निवड

     अहमदनगर  दि. ७ : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही मात्र ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षीरसागर बोलत होते.

Vijay Chaudhary elected as President of Maharashtra Prantik Teli Sabha

     अहमदनगर जिल्हा प्रांतिक तैलीक समाज सभेच्या वतीने श्रीक्षेत्र शिर्डी येथे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजसभेचा भव्य समाज मेळावा आणि विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले यावेळी या मेळाव्यासाठी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी तसेच माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर माजीआमदार शिवाजी चोथे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे जी.एम जाधव, साई शेलार, मनोज संताशे, राजेश लूटे, बद्रीसेठ लोखंडे, विजय काळे, प्रिया महिंद्र, शारदा लूटे, डॉ.अरुण भस्मे, शिरीष चौधरी राजेन्द्र पवार, प्रा.राजू मचाले, यांची देखील उपस्थिती होती. यावेळी प्रतिभा चौधरी, डॉ.सुहास व्यवहारे, डॉ.वृषाली व्यवहारे, डॉ.केदार, रुपेश चौधरी, सुखदेव वंजारी, अॅड.खोब्रागडे, कृष्णराव हिंगणकर, सखाराम मिसाळ, लक्ष्मण राऊत, मनोहर शिनगारे, रावसाहेब राऊत, रायमूल रवी कोरे, बनसोडे यांच्यासह राज्यातून मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir