वधू - वर फॉर्म

कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे ४ एप्रिल चा श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड चा वधू वर मेळावा रद्द 13 एप्रिल रोजी फक्त पुस्तक प्रकाशन

30 March 2021 sant santaji maharaj jagnade 79 views

४ एप्रिल रोजी होणारा श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड चा वधू वर मेळावा रद्द

   श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित, वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक चार एप्रिल रोजी होणार होता. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि शासनाच्या आदेशानुसार, समाजबांधवांच्या आरोग्याचा विचार करता, सदर मेळावा रद्द करून, फक्त पुस्तक प्रकाशनाचा निर्णय मेळावा कमिटीने घेतला असून, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम 13 एप्रिल गुढीपाडवा या दिवशी घेण्यात येणार आहे. ज्या समाज बांधवास वधू वर पुस्तिका हवी असेल, त्यांनी वधू-वर कमिटी संपर्क करावा. तरी सर्व वधु वर पालकांना व इतर समाज बांधवांना सुचित करण्यात आले आहे, की कोणीही चार एप्रिल रोजी मेळाव्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये. कारण मिळावा रद्द झालेला आहे आपले व इतरांचे आरोग्य धोक्यात घालू नये. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे .असे आवाहन, श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे च्या वतीने करण्यात आलेले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab