वधु - वर फॉर्म

बाळाजी भगतानी केली आई जगदंबेच्या मुर्तीची सुरक्षा - श्री. मोहन देशमाने

17 November 2015 Teli samaj 0 views

श्री भवानी माता, तेली समाज व बाळाजी भगत (भाग  3)

Teli Samaj Tulaja bhavani ahmednagar mandir     रातो रात भवानी मातेच्या मुर्ती सारखी मुर्ती शोधुन आणली. मुळ मुर्ती सिंहासनावर काढली आणि ही दुसरी मुर्ती त्या जागेवर ठेवली. रात्रीचे बारावाजून गेले होते. बाळाजीने आई जगदंबा तुमला शक्ती दे म्हणत मुर्ती उचलली. घोड्याला टांग टाकली. सोबतीचे 5/6 भगत होतेच आणि बुर्‍हानगरचा रस्ता धरला. इकडे बुर्‍हानगर जवळ करू लागले तर तुळजापूरात सुर्य उगवताच मंदिर शोधले अगदी त्वेषाने मुर्ती तोडून फोडून टाकली तो आनंदाने नाचत असतानाच त्याला कुणी तरी सांगीतले मुळ मुर्ती ही नव्हे ती रात्रीच बुर्‍हानगरच्या देवीचा भगत बाळजी भगत घेऊन गेला आहे. आनंदाने नाचणारा खान रागाने क्षणात लाल झाला बाळाजी भगत पकडा हा हुकूम सुटला. शेदिडशे सैन्य पाठलाग करू लागला. आपला पाठलाग होणार याची बाळाजी भगताला जाणीव होती. त्यामुळे तो वार्‍याच्या वेगात धावत होता. खानाच्या सैन्याने आपला वेग वाढविला काही चौकशी केली मुर्ती व बाळाजी भगत निजामशाहीत शिरला तेव्हा डोक्यावरचा सर्य कलला होता. आणि आता सुरक्षितता वाटु लागली. तर भुम परांडच्या हद्दी पर्यंत येताच शेदिडशे सैन्य थांबले. या पुढे जावे तर निजामाशी लढाई. यात आपण मुठभर तेंव्हा सैन्य मागे फिरले.

    जावळीच्या घनदाट अरण्यात जिवा या आपल्या सारख्यांच अठरा पगड जातीतल्या शुर विराने शिवाजीला वाचवीले व खानाला संपवले ही घटना निजामशाहीत वार्‍या सारखी पसरली. बाळाजीने भवानी मातेची मुर्ती पुन्हा तुळजापुर येथे नहली व मुर्तीची स्थापना केली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं