वधु - वर फॉर्म

सातारचे कै. शांताराम दळवी

27 November 2015 Other 0 views

    कै. शांताराम दळवी यांचा जन्म 2 जुन 1937 रोजी परळी (सज्जनगड), ता. जि. सातारा येथे अत्यंत गरीब कुंटूंबात झाला. त्यांना एकुण सात भाऊ दोन बहीणी असा परिवार होता. घरामध्ये अत्यंत हलाखाची परिस्थिती आणि या घरामध्ये शिक्षणाचा साधा स्पर्शही नव्हता. परंतु अशाही परिस्थीतीत त्यांनी इयत्ता चौथी पर्यतचे शिक्षण पुर्ण केल. परंतु त्यांची बुद्धीमत्ता फार मोठी वाखाण्यााजोगी होती. ते सर्व त्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या खुबीन तोंडी करायचे. कै. शांताराम दळवी हे संपुर्ण परळी भागात व सातारा जिल्ह्यामध्ये नाना या नावान सुपरिचीत होते.

    कै. नाना हे त्यांच्या भावंडामध्ये सर्वात लहान. त्यांच्या लहानपणीचा काळ हा सर्वसामान्य मुलांप्रमाणेच गेला. परंतु त्यांची देहयष्टी हि कणखर व दणकट अशी होती आणी घरची परिस्थीती हलाखीची असल्यामुळे बालवयातच मोलमजुरी वकाबाडकष्ट करण्याची वेळ बालवयातच त्यांच्यावर आली. लहाणपणी ते गावातील प्रगतशील शेतकर्‍यांकडे गुरे राखण्याचे काम करायचे. त्यावेळी त्यांच्या अंगावर ठिगळ असलेली कपडे असायचे त्यावेळी त्यांचे राहणीमाण अयंत साधे असल्यामुळे त्यांचे समकालीन मित्र व वडीलधारी लोक त्यांना येडा म्हणुन हाक मारायचे आणि त्यावेळी त्यांचयाबरोबर त्यांच्याच वयाचे भाचे श्री. महादेव विभुते हे असायचे त्यांना लोक खुळा म्हणायचे. हे दोघे मिळून तरूण पणा मध्ये परळी येथून 900 पायर्‍या चढुन वृद्ध व अपंग यक्ती यांना घेवून (पाळण्यामध्ये) सज्जनगडावर जायचे त्याबदल्यामध्ये त्यांना 50 पैस मिळायचे. तनंतर त्यांनी हळुहळु सुप, दरडी, बांबु, वासे, मंगलोरी कौले, पत्रा तसेच शहाबादी फरशी असे छोटे मोठे व्यवसाय सुरू केले लवकरच त्या धंद्यामध्ये त्यांचा जम बसला या व्यवसायांमध्ये त्यांना त्यांचे पुतणे श्री. जयसिंगराव दळवी व गजानन दळवी यांचे सहकार्य लाभले. तसेच या दोन्ही पुतण्यांना त्यांचा सहवास व आशिर्वाद लाभल्यामुळे हे दोन्ही पुतणे सातारा जिल्ह्यामध्ये किंबहुना पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये अर्थकारणात, समाजकारणात व राजकारणात तेली समाजामध्ये दिपस्तंभ ठरले.

    कै. नाना यांचे निधन ज्यावेळी झाले त्या वेळेला त्यांची सर्व मुले लहान होती. त्यांना कै. नाना यांचे मार्गदर्शन मिळू शकले नाही परंतु त्यांनी दाखविलेल पाऊल वाटेने चालुन त्यांच्या मुलांनी प्रगती केली. त्यांचा थोरला मुलगा श्री. सोमनाथ दळवी हे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी परळी गावचे सरपंच झाल. श्री. सोमनाथ हे परळी गावचे सर्वात लहान वयाचे व तेली समाजातील पहिले सरपंच ठरले. त्यांचा दुसरा मुलगा कै. नवनाथ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. तिसरा मुलगा श्री. सुरेश हे बँकेत वरिष्ठ अधिकारी आहे. व त्यांचे चौथे चि. अधिक हे सर्व कुटुंबाच्या उद्योगाची धुरा वाहत आहेत. तसेच त्यांच्या स्नुषा नुतन या केंद्र सरकारमध्ये शिक्षिका म्हणुन कार्यरत आहेत कै. नाना यांची मुले, सुना व नातवंडे ही उच्च विद्याविभुषीत आहेत.

    कै. नाना यांना सौ. लक्ष्मी, सौ. सुमन, सौ. शोभा, श्री. सोमनाथ, कै. नवनाथ, श्री. सुरेश व श्री. अधीक अशी सात मुले आहेत. ती सर्व कै. नानांच्या आशिर्वादामुळे नोकरी व व्यवसायामध्ये यशस्वी आहेत. एवढेच नव्हे तर कै. नाना हे त्यांच्या भावंडामध्ये सर्वात लहान असुन त्यांच्या भावांचे व त्यांच्या परिवाराचे राहणीमान उंचावण्यास मदत केली. शवटी एकच सांगतो त्यांना सर्वजण येडा म्हणायचे पण हेच खरे आहे कि येडेच क्रांती घडवतात. अशा महान व्यक्तीचा मृत्यु 17 एप्रिल 1990 रोजी रूबी हॉल पुणे येथे झाला. आशा व्यक्तीस कोटी कोटी प्रणाम.
शब्दांकन :- श्री. सोमनाथ दळवी 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu