वधू - वर फॉर्म

श्रीक्षेत्र सुदुंबरे देवस्थानसाठी २० लाखांचा निधी मंजूर

22 May 2021 sant santaji maharaj jagnade 119 views

अध्यक्ष शिवदास उबाळे यांची माहिती

    पुणे जिल्ह्यातील वार्षिक विकास योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील श्रीसंत संताजी महाराज मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकामाकरीता २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली. याकामी सुदुंबरे संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे, तसेच संस्थानचे सर्व पदाधिकारी व हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती तथा वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी पाठपुरावा केला होता. सुदुंबरे संस्थानच्या वतीने १०० खोल्यांचे अद्ययावत भक्तनिवास उभारण्याचा संकल्प यापूर्वीच करण्यात आला आहे. त्याकामी निधीमुळे पाठबळ मिळणार असून सध्या सुरू असलेले करोनाचे संकट दूर झाल्यानंतर सुदुंबरे संस्थानच्या वतीने नियोजित भक्तनिवास बांधकाम सुरू करण्याचा मानस आहे, असेही अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी यावेळी सांगितले.

Santa Santa mandir sudumbre DEVSTHAN

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh