Bride / Groom Form

स्व. आर. टी. अण्णा चौधरी यांना खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने श्रद्धांजली

29 May 2021 jalgaon teli samaj 80 views

         तेली समाजाचे उत्तर महाराष्ट्रातील मार्गदर्शक व आधारस्तंभ तैलिक महासभेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष स्व. आर. टी. अण्णा चौधरी यांना आज खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंडळाच्या कार्यालयात समाज सारथी भाऊसाहेब दौलत नामदेव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत सर्वप्रथम श्री अनिल नाना अहिरराव यांनी आर.टी. अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले. मंडळाचे मार्गदर्शक श्री  शशीभाऊ चौधरी, श्री रमेश तुकाराम चौधरी यांनी माल्यार्पण केले. यावेळी मंडळाचे सचिव रवींद्र चौधरी यांच्या आजी स्व. शांताबाई पाटील ,मंडळाचे मार्गदर्शक सुभाष बापू सोनवणे यांचे जावई स्व.धर्मेंद्र पांडुरंग चौधरी, व्याही स्व.पांडुरंग चौधरी, मंडळाचे कार्यकर्ते स्व.प्रवीण हिरामण चौधरी तसेच तेली समाजातील मृत पावलेल्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आर.टी.अण्णांच्या कार्याची माहिती देण्यात येऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच मार्गक्रमण करून समाजाचा विकास केला तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे यावेळी सांगण्यात आले. शोकसभेमध्ये मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,धुळे शहर कार्याध्यक्ष अमोल हिरामण चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक दगाजी महाले, चंद्रकांत श्रीराम चौधरी, गजानन एकनाथ चौधरी, प्रमोद धोंडू चौधरी,यतीनआप्पा रतन चौधरी,कमलेश कैलास चौधरी, नाना चहावाले आदी उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran